म. टा. वृत्तसेवा, कल्याण

दिल्लीतील निझामुद्दीन येथील मरकजमध्ये भारतासह चीन, इंडोनेशिया, मलेशियासह अनेक देशांतील धर्मगुरू स‍हभागी झाले होते. या धार्मिक मेळाव्‍यात सहभागी असलेल्‍या धर्मगुरुंनी नंतर आपापल्‍या भागांत जात विविध धार्मिक कार्यक्रमांत सहभाग घेतल्‍याचे समजते. करोनाच्या पार्श्वभूमीवर या धार्मिक मेळाव्‍याशी प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष संबंध आलेल्‍या ज्‍या व्‍यक्‍ती सध्‍या कल्‍याण-डोंबिवली शहरात आहेत किंवा बाधित आढळण्‍याची शक्‍यता आहे, त्‍यांचा शोध घेण्‍याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

मरकज कार्यक्रमाला हजर असणाऱ्या व्यक्तींनी किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची माहिती महापालिका प्रशासनास कळवण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, अशा नागरिकांची माहिती अन्य कोणालाही प्राप्‍त झाल्‍यास त्‍यांनीही महापालिकेच्‍या हेल्‍पलाइन क्रमांक ०२५१-२२११३७३ या क्रमांकावर कळवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ही माहिती अत्‍यंत महत्त्वाची असल्‍याने ती लपवून ठेवल्‍यास साथीचे रोग प्रतिबंधात्‍मक कायदा १८९७ अन्‍वये संबंधितांवर गुन्‍हा दाखल करण्‍याचे निर्देश पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here