नवी दिल्ली : भारताने आज महिला विश्वचषकात बांगलादेशवर दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने महिला विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. पण भारताच्या या विजयात अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीमे एक मोछा विक्रम रचला आहे. आतापर्यंत ही गोष्ट कोणालाही जमललेली नाही.

झुलन गोस्वामीने नेमका कोणता मोठा विक्रम रचला, पाहा…
आजच्या सामन्यात जेव्हा झुलनने पहिला चेंडू टाकला तेव्हाच तिने विक्रमाला गवसणी घातली होती. झुलनने आता २०० एकदिवसीय डावांमध्ये गोलंदाजी करण्याचा मोठा पराक्रम केला आहे. आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये ही गोष्ट कोणालाही जमलेली नाही. या सामन्यात झुलनने बांगलादेशकडून सर्वाधिक ३२ धावा करणाऱ्या सलमा खातूनला बाद करत भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर भारतीय संघाला अखेरची विकेटही झुलनने मिळवून दिली. झुलनचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील २०१वा सामना होता, या सामन्यांपैकी २०० डावांमध्ये झुलनने गोलंदाजी केली आहे. भारतीय संघाने आजच्या महिला विश्वचषकातील सामन्यात बांगलादेशवर ११० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा भारतीय संघाला मोठा फायदा हा गुणतालिकेत झालेला आहे. कारण आजच्या मोठ्या विजयानंतर भारतीय संघाची सरासरी ही चांगलीच वाढलेली आहे. त्यामुळे भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी या विजयाचा चांगलाच फायदा होऊ शकतो. भारताने आतापर्यंत विश्वचषकात सहा सामने खेळले आहे. या सहा सामन्यांमध्ये भारताने तीन विजय मिळवले आहेत, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आजच्या विजयानंतर भारताची सरासरी +०.७६८ इतकी आहे. भारताच्या पुढे द.आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा संघ अनुक्रमे दुसऱ्या व पहिल्या स्थानावर आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर असला तरी त्यांची सरासरी ही भारतापेक्षा कमी आहे. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर असून त्यांची सरासरी ही +०.०९२ एवढी आहे. विश्वचषकात भारताची अजून एक लढत शिल्लक आहे. अखेरच्या लढतीत विजय मिळून टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्याची संधी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here