मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकासआघाडीच्या नेत्यांवर एकापाठोपाठ एक सुरु असलेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड कमालीचे उद्विग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. याच उद्विग्नतेपोटी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. ईडी आणि प्राप्तीकर विभागाकडून आतापर्यंत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या आहेत. मात्र, उद्या ‘ईडी’ने माझ्या मुलीला चौकशीला बोलावले तर मी आत्महत्या करेन, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. महाविकास आघाडी घ्यायचा तो निर्णय घेईल पण मला विचाराल तर आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ‘टीव्ही ९ मराठी’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. (NCP leader Jitendra Awhad says I will suicide if ED calls my daughter for probe)
Video : पाटणकर मामांवर कारवाई, भाचा आदित्य ठाकरे एकच वाक्य बोलत होते…
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या काही नेत्यांकडून जितेंद्र आव्हाड हे देखील तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे. जितेंद्र आव्हाड यांना अशा कोणत्या कारवाईची चाहुल लागली आहे का? याच उद्विग्नतेमधून त्यांनी हे वक्तव्य केले का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
ठाकरेंच्या मेहुण्याला ईडीचा दणका, संजय राऊतांची सेना भवनातली ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली!
‘ईडी’कडून मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. यामध्ये ठाणे परिसरातील निलांबरी इमारतीमधील ११ सदनिकांचा समावेश आहे. या सदनिकांची बाजारभावानुसार किंमत जवळपास ६.५ कोटी रुपये इतकी असल्याचे समजते. ‘ईडी’ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर थेट कारवाई केल्याने आता भविष्यात तपासयंत्रणा महाविकास आघाडीतील कितीही बडा नेता असला तरी कारवाई करण्यास कचरणार नाहीत, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाविकास आघाडी काही निर्णायक पाऊल उचलणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जितेंद्र आव्हाड आणखी काय म्हणाले?

राज्य सरकारकडून भाजप नेत्यांची चौकशी सुरु असली तरी कोणालाही तुरुंगात टाकले आहे का? चौकशी करणे आणि धाडी टाकणे यामध्ये फरक आहे. पण आता केंद्रीय यंत्रणा थेट घरात घुसल्या आहेत. अर्थात यावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते चर्चा करतील. पण मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असे आव्हाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here