करोनाचा प्रसार रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाउनचा आजचा १४ वा दिवस आहे. देशभरात करोना विषाणूची जलदगतीने वाढ होत असून देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ४ हजाराहून अधिक झाली आहे. तर, या साथीच्या आजारामुळे आतापर्यंत १०१ लोकांचा मृत्यू झाला आहे. पाहुयात, करोनाशी संबंधित महत्वाचे अपडेट्स…

Live अपडेट्स…

>> देशभरात गेल्या २४ तासात करोनाचे ७०४ नवे रुग्ण आढळले.

>> महाराष्ट्र: लॉकडाउनचा कालावधी वाढणार की कसे याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे वक्तव्य.

>> दिल्लीत करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५२५. यांमध्ये ३२९ तबलीघी जमातीशी संबंधीत.

>> तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा, १४ एप्रिलनंतरहा ३ जूनपर्यंत सुरू राहील लॉकडाउन.

>> नमस्कार, मटा ऑनलाइनच्या लाइव्ह आर्टिकलमध्ये आपले स्वागत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here