Mumbai Fire | आतापर्यंत या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीमधील सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Mumbai Fire: मुंबईतील इमारतीला आग
हायलाइट्स:
आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत
या आगीने काहीवेळातच रौद्ररुप धारण केले आहे
मुंबई: दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील विठ्ठल निवास या इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीने काहीवेळातच रौद्ररुप धारण केले आहे. सध्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. त्यानंतर ही आग अन्य मजल्यांवर पसरत जाऊन आगीने भीष स्वरुप धारण केले. या परिसरात सध्या आगीचे आणि धुराचे प्रचंड लोळ उठत आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु असताना बघ्यांनीही मोठ्याप्रमाणावर गर्दी केली आहे. इमारतीमधील सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Major Fire in Mumbai)
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.