मुंबई : महाराष्ट्रातील ईडीच्या कारवायांचा धडाका आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत येऊन पोहोचला आहे. ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे म्हणजेच रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर (Shreedhar Patankar) यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर मंगळवारी कारवाई केली. यावरून आता मनसेने नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे.

ईडीच्या या कारवाईमुळे एकीकडे राजकारणात खळबळ उडाली असून विरोधक यावर जोरदार टीका करत आहेत. पण अशात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक मराठी चित्रपटातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दुनियादारी या मराठी चित्रपटातली ही व्हिडीओ क्लिप आहे. ज्यामध्ये जितेंद्र जोशी “मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे” असा डायलॉग मारत आहेत. मनसेने हा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता शेअर केला आहे. तर याला ‘पाहुणे आले घरापर्यंत!’ असं कॅप्शनही दिलं आहे.

पुणे हादरलं! कुख्यात गुंडांच्या मुलाकडून भयंकर गुन्हा, विद्यार्थिनीला वेगवेगळ्या लॉजवर नेलं आणि…

काय आहे नेमकं प्रकरण?

रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर (Shreedhar Patankar) यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर मंगळवारी कारवाई केली. या कंपनीच्या मालकीच्या ठाण्याचील निलांबरी प्रकल्पातील ११ फ्लॅट्सवर ईडीने टाच आणली असून ही मालमत्ता जवळपास साडे सहा कोटी रुपयांची आहे. मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ईडीने (ED) ही धडक कारवाई केली.

शरद पवारांचा मोठा निर्णय, धनंजय मुंडेंवर आता दुहेरी जबाबदारी
खरंतर, आजपर्यंत राष्ट्रवादीचे मंत्री ईडीच्या रडारवर होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सध्या बिनखात्याचे मंत्री असलेले नवाब मलिक यांच्यावर ईडीने धडक कारवाई केली. पण आता ईडीने थेट ठाकरे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांवर कारवाईचं हत्यार उपसलं. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे, रश्मी ठाकरे यांचे सख्खे बंधू व्यावसायिक श्रीधर पाटणकर यांना ईडीने मोठा दणका दिला. पाटणकरांच्या ठाण्यातल्या निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या. जवळपास साडे सहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली. पाटणकरांवरील कारवाई ही महाविकास आघाडीसाठी आतापर्यंतचा सर्वांत मोठा धक्का मानली जातीय.

भाजपची लाकडं राजकीय स्मशानात रचली आणि आता…, संजय राऊतांची जळजळीत टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here