औरंगाबाद : राज्यातील महत्त्वाची यात्रा समजल्या जणाऱ्या पैठण नाथ षष्ठी यात्रेला ( eknath shashthi 2022 ) आजपासून सुरवात झाली आहे. हजारो वारकरी सकाळपासून नाथनगरीत दाखल झाले आहेत. करोनामुळे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णक्षमतेने ही यात्रा भरली असल्याने नाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रांगा लावल्या आहेत.

सकाळपासून पैठणनगरीत तब्बल साडेचारशेपेक्षा अधिक दिंड्या दाखल झाल्या आहेत. तर नाथ समाधी वाड्यात नाथ महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासून लाखो भाविक पहाटेपासून नाथ रांगा लावून उभे होते. तर पैठण यात्रेत ४०० वर्षांहून अधिक वर्षांपासून पायी दिंडीची परंपरा आहे. तर आजपासून तीन दिवस हा सोहळा चालणार आहे.

eknath shashthi 2022 paithan

नाथ षष्ठीला पैठणमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी


अष्टमीला म्हणजेच २५ मार्चला एकनाथ महाराजाच्या पादुकांसमोर महाआरती झाल्यानंतर नाथवंशज गावातील नाथवराज नाथमंदिरापासून मिरवणुकीने बाहेरील नाथमंदिरात पोहोचेल. परंपरेनुसार सूर्यास्तावेळी समाधी मंदिरात नाथवंशजांच्या हस्ते लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत काला दहिहंडी फोडून नाथषष्ठीची सांगता होईल. यावेळी हजारो भाविकांची गर्दी असते.

एसटी महामंडळही सज्ज

पैठण येथील नाथषष्ठी यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळही सज्ज झाले आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून पैठणला जाणाऱ्या भाविकांसाठी मंगळवारी ४० लालपरी सोडण्यात आल्या. तर आज सकाळपासूनच ९० बसेस पैठणसाठी सज्ज आहेत, अशी माहिती एसटी महामंडव्याच्या वतीने देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here