चेतन सावंत, मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी आयुष्य आणि धर्मही विकला. त्यामुळे ते कितीही आरोप झाले तरी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत, अशी बोचरी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून नैतिकतेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याविषयी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना विचारण्यात आले असता त्यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलेच फटकारले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Sanjay Raut: श्रीधर पाटणकरांवरील कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय बोलणं झालं, संजय राऊत म्हणाले…
यावेळी किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून बसल्याची टीका केली. उद्धव ठाकरे यांनी त्यासाठीच नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाही. भविष्यात आपले घोटाळेही बाहेर येतील आणि आपल्या राजीनाम्याची मागणी होईल, याची जाणीव उद्धव ठाकरे यांना होती. त्यामुळेच देशद्रोह्यांना टेरर फंडिग करणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण महाराष्ट्राची जनता हे चालून देणार नाही. आमची लढाई ही सरकार पाडण्यासाठी किंवा कोणाचा राजीनामा घेण्यासाठी नाही. तर भाजपची लढाई ही महाराष्ट्राला घोटाळेबाजांपासून मुक्त करण्यासाठी असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
Sanjay Raut:’ईडी’ने थेट ठाकरेंच्या नातेवाईकांवर कारवाई का केली? संजय राऊतांनी मांडली नवी थिअरी

‘शिवसेनेच्या सहा नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार’

‘उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यामध्ये जमिनीचा व्यवहार आहे, हे मी आधीपासून सांगत होतो. मात्र, तेव्हा माफीया सेनेचे लोक माझ्यावर हल्ला करत होते. हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीसोबत (Nandkishor Chaturvedi) उद्धव ठाकरेंचे संबंध काय आहेत, हे त्यांनीच सांगावं. म्हणजे ईडीला आणि इतर तपास यंत्रणांना जास्त मेहनत करावी लागणार नाही. उद्धव ठाकरेंनी १९ बंगले लपवण्याचा खूप प्रयत्न केला. ठाकरे कुटुंबाने उभी केलेली एक कंपनी नंदकिशोर चतुर्वेदींना कशी गेली? गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांचा माफियांप्रमाणे वापर करून पैसे जमा करण्यात येत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या सहा नेत्यांचे घोटाळे मी लवकरच बाहेर काढणार असल्याचा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here