मुंबई :विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवरील सारी गणितं बदलून गेली आहेत. या सिनेमानं आणि त्याला मिळालेल्या यशामुळे प्रत्येक दिग्दर्शकाला, निर्मात्यांना वेगळा विचार करायला लावलं आहे. अवघ्या १५-२० कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमानं तो प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या १२ दिवसांत १९० कोटींची घसघशीत कमाई केली आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जी कमाई केली आहे, त्यामुळे ३०० कोटींमध्ये तयार झालेला प्रभासचा ‘राधे श्याम’ सिनेमाही फ्लॉप झाला आहे. द काश्मीर फाइल्स सिनेमात अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पुनीत इस्सर यांनी केलेल्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं आहे. परंतु या सर्व कलाकारांनी किती मानधन आकारलं याचं सर्वांनाच कुतूहल आहे.

मन पिळवून टाकणारं कथानक

‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमात १९९० मध्ये काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय, त्यांच्यावर झालेले अत्याचार दाखले आहेत. वास्तवात घडलेल्या अनेक घटना मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता होती. त्यामुळेच सिनेमाला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. काश्मिरी पंडितांचं हत्याकांड पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली. त्यामुळे सिनेमावर अनेक कलाकारांनी टीका देखील केली आहे. यामध्ये नाना पाटेकर, प्रकाश राज, स्वरा भास्कर यांनी सिनेमात जे दाखवलं आहे त्यामुळे समाजातील भावना भडकवल्या जात असल्याचा आणि समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका झाली आहे.

‘द काश्मीर फाइल्स’मुळे ‘बच्चन पांडे’वर गदा, सुरू असलेला सिनेमा जबरदस्तीने थांबवला

सर्वाधिक मानधन घेतलं मिथुन चक्रवर्ती यांनी

दरम्यान, इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या अनेक बातम्यांमध्ये सिनेमातील कलाकारांच्या मानधनाचा उल्लेख आहे. अर्थात निर्मात्यांनी या वृत्तांना दुजोरा दिलेला नाही. परंतु या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार अनुपम खेर यांच्यापेक्षा जास्त मानधन मिथुन चक्रवर्ती यांनी घेतलं आहे. केवळ इतकंच नाही तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील अनुपम खेर यांच्याइतकं मानधन घेतलं आहे. रिपोर्टनुसार द काश्मीर फाइल्स सिनेमासाठी अनुपम खेर यांनी एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे. अनुपम यांनी सिनेमात पुष्करनाथ पंडित ही भूमिका साकारली होती. तर पुष्करनाथ पंडित यांचा मित्र आएएस ब्रह्म दत्त ही भूमिका मिथुन चक्रवर्ती यांनी साकारली आहे. यासाठी त्यांनी १.५ कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

मिथुन चक्रवर्ती

विवेक अग्निहोत्रींनी देखील घेतले एक कोटी रुपये

असंही सांगितलं जातं की, सिनेमात प्रोफेसर राधिका मदान ही भूमिका पल्लवी जोशी हिनं साकारली आहे. या भूमिकेसाठी पल्लवीनं ५० ते ७० लाख रुपये मानधन घेतलं आहे. तर सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी विवेक अग्निहोत्री यांनी एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे. दर्शन कुमार यानं कृष्णा पंडित ही भूमिका साकारण्यासाठी ४५ लाख रुपये, तर मिथुन चक्रवर्ती यांच्या बायकोची भूमिका साकारणाऱ्या मृणाल कुलकर्णी यांनी ५० लाख रुपये मानधन घेतलं आहे. या सिनेमासाठी पुनीत इस्सार यानं देखील ५० लाख रुपये मानधन घेतलं आहे. पुनीतनं सिनेमात डीजीपी हरी नारायण ही भूमिका साकारली आहे.

The kashmir Files: सिनेमामुळे समाजात विद्वेषाची बिजं पेरली जात आहेत, प्रकाश राज यांची टीका

बॉक्स ऑफिसवर केली घसघशीत कमाई

द काश्मीर फाइल्स सिनेमा ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली आहे. या सिनेमानं आतापर्यंत १९० कोटी रुपये कमावले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला सिनेमाच्या कमाईमध्ये काहीशी घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमाला २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here