लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनस बौद्धवाडी येथील रहिवासी रवींद्र हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे. तसेच ‘तू माझा मुलगा नाहीस’ असे ते नेहमी बोलायचे. शनिवारी मध्यरात्री पुन्हा घरात भांडण झाले. रवींद्र कांबळे यांचा पत्नीशी वाद झाल्यानंतर मुलावरही चिडले. ‘तू माझा मुलगा नाहीस’ असे ते पुन्हा त्याला म्हणाले. राग अनावर झालेल्या मुलानं लोखंडी हातोड्याने त्यांच्या डोक्यावर प्रहार केले. यात ते गंभीर जखमी झाले होते.
गंभीर जखमी झालेल्या रवींद्र यांना तात्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. लांजा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब घुटुगडे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तक्रारीनुसार, पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. रुग्णालयात उपचार घेत असतानाच, दुसऱ्या दिवशी रवींद्र यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला. या घटनेचा अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब घुटुगडे करत आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times