राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे. आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला असल्याची माहिती आहे.

 

rupali chakankar 5
रुपाली चाकणकर

हायलाइट्स:

  • रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
  • प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे राजीनामा पाठविला
  • राष्ट्रवादीकडून लवकरच नव्या महिला अध्यक्षाची घोषणा होणार
मुंबई : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राजीनामा (Rupali Chakankar Resign) दिलेला आहे. आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला असल्याची माहिती आहे. चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद देखील आहे. त्याचवेळी त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष देखील होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या राजीनामा देणार अशी चर्चा होती. अखेर चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रवादीकडून लवकरच नव्या महिला अध्यक्षाची घोषणा होईल, अशी माहिती कळतीय.

रुपाली चाकणकर यांच्यावर महिला आयोगाच्या कामाचा मोठा भार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यापासून त्यांनी अतिशय नेटाने काम करुन अनेक मोठी प्रकरणं हाताळली आहेत. महिलांना न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ म्हणत विदर्भ, उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला आयोगातर्फे त्यांनी शिबीरं घेतली. महिला आयोगाचं काम अतिशय ताकदीने हाताळताना त्यांना राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे वेळेअभावी म्हणावं असं लक्ष देता येत नव्हतं. कदाचित याच कारणामुळे त्यांनी राजीनामा दिलेला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

(ही बातमी आताच ब्रेक झाली आहे….)

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : rupali chakankar resigns as ncp women state president
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here