मुंबई: करोनामुळे संचारबंदी असतानाही बाइकवरून फिरताना एक बाइकस्वार महिलेच्या अंगावर थुंकल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांताक्रुझ येथे ही घटना घडली असून या अज्ञात बाइकस्वाराचा पोलीस शोध घेत आहेत.
ही २५ वर्षीय महिला मणिपूर येथील रहिवासी आहे. गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यासाठी ही महिला तिच्या मित्रासोबत सांताक्रुझच्या मिलिट्री कँम्पच्या दिशेने जात होती. त्याचवेळी हा बाइकस्वार समोरून आला आणि तिच्या अंगावर थुंकून पसार झाला. या महिलेने केलेल्या आरोपानुसार त्याने तोंडावरचा मास्क काढला होता. अशा प्रकारामुळे करोनाची लागण होऊ शकते. त्यामुळेच या व्यक्तीविरोधात या महिलेने गुन्हा नोंदवल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, राज्यात करोना रुग्णांचा आकडा ८६८वर पोहोचला असून मुंबईतील करोना रुग्णांचा आकडा ५२६वर गेला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times