नांदेड: दिल्लीतील निजामुद्दीन येथे धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर नगर आणि नांदेडमधील मशिदीत लपून राहिलेल्या ४५ तबलिगींविरोधात गुन्हे दाखल करण्यता आले आहेत. या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना क्वॉरंटाइन करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

नांदेड पोलिसांनी रविवारी १० इंडोनेशियन नागरिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे दहाही जण तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यातील दोनजण नांदेडमधील रहिवासी असून हे दोघेही या इंडोनेशियन नागरिकांसोबत दिल्लीच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते.

हे सर्व लोक १५ मार्च रोजी नांदेडला पोहोचले होते आणि इथल्या एका मशिदीमध्ये थांबले होते. त्यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली नव्हती. आता त्यांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. आम्ही त्यांचे स्वॅबही तपासणीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

तर अहमदनगर पोलिसांनी एकूण ३५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून हे सर्व तबलिगी जमातचे कार्यकर्ते आहेत. हे ३५ लोक दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यात २९ परेदशी नागरिकांचा समावेश आहे. या परदेशी नागिरकांनी दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन व्हिसा नियमांचं उल्लंघन केलं आहे. हे लोक सुद्धा नगरच्या स्थानिक मशिदीत थांबले होते. या लोकांनी त्यांच्या दिल्लीवारीबद्दल स्थानिक पोलिसांना माहिती दिली नव्हती, असं अतिरीक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितलं. ४ परदेशी नागरिक आणि १४ स्थानिक लोक त्यांच्या संपर्कात आले असून त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here