पुणे : कीर्तनकार बंडातात्या कराडकर हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात आपल्या भाषणामध्ये महात्मा गांधींच्या कार्याचा उल्लेख करताना गंभीर विधानं केली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. यावेळी बोलताना त्यांनी महात्मा गांधी यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे वातावरण तापलं आहे.

ते म्हणाले की, ‘स्वातंत्र्य हे महामा गांधी याच्या अहिंसावादामुळे नव्हे तर क्रांतिकारकांमुळे मिळाले आहे. महात्मा गांधी यांचे हिंदुत्व आणि अहिंसावाद हे दोन्हीही पक्षपातीच आहेत.’ त्यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फूटणार हे नक्की.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात नाराजी नाट्य, बॅनरवरील ‘एका’ फोटोवरुन अंतर्गत कुजबूज
“भगतसिंग यांनी केलेली क्रांती अभूतपूर्व आहे. सुरुवातीला महात्मा गांधींच्या अहिंसावादी धोरणाची भगतसिंग यांच्या मनावर छाप होती. आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायच आहे, असं भगतसिंग यांना वाटायचं. पण, भगतसिंगाच्या भ्रमाचा भोपळा ३ वर्षांमध्ये फुटला,” असंही बंडातात्या यांनी म्हटलं आहे.

बंडातात्या कराडकर इतकंच बोलून थांबले नाही तर यावेळी त्यांनी महात्मा गांधींचा म्हाताऱ्या म्हणूनही उल्लेख केला. महात्मा गांधीजींना म्हाताऱ्याची उपमा देत त्यांच्या मार्गाने जाण्याचे कारण नाही. त्यानंतर भगतसिंग क्रांतीकारक बनले. या दरम्यान लोकमान्य टिळकांची आठवण करुन देत या म्हाताऱ्याच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवायचा विचार केला तर १ हजार वर्ष लागली असती, असंही बंडातात्या कराडकरांनी म्हटलं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे आता काय वाद पेटणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

व्यवसायासाठी घेतलेले पैसे आणि सोने परत न दिल्याने केले धक्कादायक कृत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here