हिंगोली : हिंगोलीत शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात बॅनरवर लावण्यात आलेल्या फोटोवरुन नाराजी नाट्य सुरु असल्याचं दिसून येतं. जय प्रकाश मुंदडा हे वसमत विधनसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा राज्याचे माजी सहकार मंत्री आहेत. शिवसेनेची शिवसंवाद मोहीम राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. हिंगोलीतदेखील कालपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियनाला सुरूवात झाली आहे.

कोल्हापूर लोकसभेचे खासदार संजय मंडलिक हे या अभियानाचं नेतृत्व करत आहेत. संजय मंडलिक हिंगोलीत आल्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगोलीत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. मात्र, वसमत विधानसभेचे शिवसनेचे माजी आमदार तथा माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचे फोटो त्यावर नसल्याने शिवसेनेची अंतर्गत कुजबुज पुन्हा एकदा दिसून आली.

shiv sampark abhiyan १

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी भाषा अनिवार्य; आज विधानसभेत विधेयक मांडणार

शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात लावलेल्या बॅनरवरून जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. बॅनरवरील फोटो नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर उमटला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जयप्रकाश मुंदडा यांचे नाव लोकसभेच्या तिकिटासाठी चर्चेत होते. परंतु, ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून बाहेरचा उमेदवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड मतदार संघातील हेमंत पाटील यांना तिकीट दिल्यामुळे यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारे नाराजी नाट्य रंगल्याचे बघायला मिळाले. पण सुरु असलेल्या नाराजी नाट्याचा आगामी काळात कोणाला फायदा होणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

व्यवसायासाठी घेतलेले पैसे आणि सोने परत न दिल्याने केले धक्कादायक कृत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here