औरंगाबाद : सध्याच्या जगात विज्ञात आणि आधुनिकतेमुळे खूप प्रगती झाली आहे. पण यामुळे तितक्याच मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीही वाढल्याचं पाहायला मिळतं. हायटेकच्या या जमान्यात गुन्हेही हायटेक होत चालले आहे. औरंगाबादमध्ये याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गाडीचे हप्ते चुकवण्यासाठी पठ्ठ्याने असं काही केलं की तुमचाही विश्वास बसणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, फायनान्स कंपनीचे हप्ते चुकविण्यासाठी पठ्ठ्याने मोठी शक्कल लढवली. पण अखेर त्याचं हे पितळं उघडं पडलं आहे. यासंबंधी वाहतूक पोलिसांनी मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास जळगाव टी पॉईंट सिग्नलजवळ मोठी कारवाई केली.

बंडातात्या कराडकरांची जीभ पुन्हा घसरली, महात्मा गांधींचा केला एकेरी उल्लेख
वसिष्ठ वाल्मिक सावंत (वय २३, रा. काळेगाव तडी, ता. माजलगाव, जि. बीड) हा जळगाव टी पॉईंट येथून दुचाकीने जात होता. त्यावेळी वाहनांची तपासणी करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी सावंतला थांबवले. त्याच्या दुचाकीची अपद्वारे तपासणी केली. तेव्हा दुचाकीवर बनावट क्रमांक असल्याचे निदर्शनास आले. म्हणजेच वसिष्ठ हा गाडीचे हप्ते चुकवण्यासाठी थेट बनावट क्रमांक टाकून दुचाकी वापरत होता.

ही बाब लक्षात येताच पोलिसांनी चौकशी केली असता सावंतचे भावजी बाबासाहेब आसाराम थोरे (वय ३९, रा. लिंगसा, ता. परतूर) याने फायनान्स कंपनीचे हप्ते चुकविण्यासाठी दुचाकीवर बनावट क्रमांक टाकल्याचे समोर आले. त्यावरुन सावंतला मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास जमादार कोंडके करत आहेत.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात नाराजी नाट्य, बॅनरवरील ‘एका’ फोटोवरुन अंतर्गत कुजबूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here