aurangabad news today in hindi: मोठी बातमी! २८ प्रवासी घेऊन निघालेल्या बसला अचानक लागली आग, क्षणात संपूर्ण बस जळून खाक – aurangabad news bus carrying 28 passengers suddenly caught fire passengers were safe
औरंगाबाद : आज पहाटे औरंगाबाद जिल्ह्यातील जळगाव महामार्गावरील अजिठा रोडवर धक्कादायक घटना समोर आली असून, पुण्यावरून मलकापूरला २८ प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसने अचानक पेट घेतला. मात्र, चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या भीषण अपघातामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साई ट्रॅव्हल्सची लक्झरी बस (MH12.EQ.9007) पुण्यावरून मलकापूरकडे २८ प्रवासी घेऊन जात होती. दरम्यान, सकाळी पहाटे पाच वाजता औरंगाबाद- जळगाव महामार्गावरील अजिंठा रोडवरील भारत दर्शनजवळ या धावत्या बसने अचानक पेट घेतला. बसला अचानक आग लागताच एकच गोंधळ उडाला, पण याचवेळी बसचालक संतीष गई यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. तर घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गाडीचे हप्ते चुकवण्यासाठी ‘अशी’ केली आयडिया, नंबरप्लेट स्कॅन करताच पितळं उघड अन्यथा चित्र वेगळं असतं…
सुरुवातीला लक्झरी बसच्या एका चालकाने पेट घेतला होता. मात्र, त्यांनतर आग वाढत गेली. बसने पेट घेतल्याचे बसचालक संतीष गई यांच्या लक्षात आहे. त्यामुळे त्यांनी बस जागेवरच थांबवली. त्यांनतर बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना बसमधून उतरवलं. प्रवासी खाली उतरताच आगीचा भडका उडाला आणि पाहता-पाहता बस जळून खाक झाली. पण बसचालक संतीष गई यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती आणि चित्र काही वेगळंच असतं.