पुणे : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राजीनामा (Rupali Chakankar Resign) दिला आहे. बुधवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. सध्या चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे. त्यांच्या या राजीनाम्यावेळी झालेल्या बैठकीमध्ये एकच गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

रुपाली चाकणकर या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं कळताच महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री जयंत पाटील यांचेही आभार मानले. इतकंच काय तर त्यांच्या भाषणावेळी ‘ताई, नको; ताई, नको; तुम्ही राजीनामा देऊ नका’ असंही महिला म्हणू लागल्या. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महिला पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर होताच रुपाली चाकणकर यांनीही आपलं भाषण थांबवलं आणि सगळ्यांना शांत केलं नंतर पुन्हा भाषणाला सुरुवात केली. बैठकीतला हा सर्व प्रकार मंत्री जयंत पाटील आणि आदिती तटकरे स्तब्ध होऊन पाहत होते.

खरंतर, रुपाली चाकणकर गेल्या राजीनामा देणार अशी काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून नव्या महिला अध्यक्षाची जबाबदारी कोणाकडे देण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बंडातात्या कराडकरांची जीभ पुन्हा घसरली, महात्मा गांधींचा केला एकेरी उल्लेख
चाकणकरांच्या भाषणाचा ‘पुणेरी ठसका’

रुपाली चाकणकरांच्या भाषणाचा एक वेगळा ठसका आहे. पुणेरी भाषेत भाषण करताना टोले, टोमण्यांनी आणि हिंदीतल्या शायरींनी ते प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडतात. भाजपकडून महाविकास आघाडीवर वार झाला की त्याला प्रतिवार म्हणून रुपाली चाकणकर पुढे येतात, आणि समोरच्याला तितकंच आक्रमक प्रत्युत्तर देतात. राजकारणाबरोबच त्यांचं सामाजिक काम देखील मोठं आहे.

रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्याने आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षपदाचं नाव जाहीर करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात नाराजी नाट्य, बॅनरवरील ‘एका’ फोटोवरुन अंतर्गत कुजबूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here