मुंबई :विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘द काश्मीर फाइल्स‘ सिनेमाची देशात जोरदार चर्चा आहे. काही प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिल्यानंतर त्याच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर काहींच्या मते हा एक विशिष्ट प्रोपोगांडा करणारा सिनेमा आहे. अनेक प्रेक्षकांबरोबरच काही कलाकारांनी देखील या सिनेमामुळे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न, मुस्लिम समाजाबद्दल द्वेष निर्माण करणारा सिनेमा असल्याची टीका केली आहे. या सिनेमातील प्रमुख कलाकार अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे.

म्हणून मिथुन चक्रवर्तींच्या सूनबाईनं पाहिला नाही The Kashmir Files

अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून १९ वर्षांपूर्वी काश्मीर खोऱ्यामध्ये २४ लोकांच्या हत्याकांडावर आधारित बातमीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलं जात आहे की, काही संशयित अतिरेक्यांचा गट लष्कराच्या गणवेशात आला. त्यांनी २४ हिंदू लोकांना त्यांच्या घरातून बळजबरीनं बाहेर आणलं. त्या सर्वांना एका ओळीत उभं केलं आणि त्यांना गोळ्या मारून ठार केलं. ही घटना म्हणजे अल्पसंख्यकांवरील मोठा दहशतवादी हल्ला होता. या व्हिडिओमध्ये असंही सांगितलं आहे की, या दुर्दैवी घटनेत दोन लहान मुलं, ११ पुरुष आणि ११ महिलांना जीवे मारण्यात आलं. ही अशीच घटना जशीच्या तशी द काश्मीर फाइल्स सिनेमात दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या जीवलग लोकांना अशा क्रूर पद्धतीनं मारलेलं पाहिल्यानंतर हृदय पिळवटून टाकणारे नातेवाईक दिसत आहे.

हा व्हिडिओ अनुपम खेर यांनी शेअर करत लिहिलं आहे की, ‘हे हत्याकांड बरोबर १९ वर्षांपूर्वी झालेलं आहे. जे लोक काश्मीर खोऱ्यातील हिंदूंच्या हत्याकांडावर टीका करतात किंवा द काश्मीर फाइल्स सिनेमा प्रोपोगांडा असल्याचा आरोप करतात त्यांनी हा व्हिडिओ बघावा. एपी एजन्सीच्या या व्हिडिओमध्ये अतिरेक्यांनी २४ निरपराध लोकांची क्रूरपणे हत्या केल्याचं दिसत आहे. यांची माफी मागा. पश्चाताप करा. त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा.त्याचं दुःख वाढवू नका. ‘

अनुपम खेर

आमिर खानला या ५ चुका पडल्या महागात, ‘लालसिंग चड्ढा’वर बहिष्कार टाकण्याची मागणी

द काश्मीर फाइल्स सिनेमात १९९० च्या दशकात काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी हिंदू लोकांचा अतिरेक्यांनी प्रचंड छळ केला, त्यांच्यावर अत्याचार केले. त्यामुळे या लोकांना जीव वाचवण्यासाठी आपली राहती घरं सोडून निर्वासित व्हावं लागल्याचं दाखवण्यात आलं आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडत घसघशीत कमाई केली आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी करोनाची भीती विसरून प्रेक्षक घराबाहेर पडले आणि सिनेमागृहात गेले. परंतु सोशल मीडियावर मात्र हा सिनेमा एका विचारांचा प्रोपोगांडा मांडणारा असल्याचा आरोप केला जात आहे. बॉलिवूडमधील नाना पाटेकर, प्रकाश राज, स्वरा भास्कर, आदिल हुसैन यांच्यासह काही कलाकारांनी या सिनेमावर टीका केली आहे. या सर्वांना अनुपम यांनी चोख उत्तर दिलं असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here