औरंगाबाद : छोट्या-मोठ्या कारणावरून पती-पत्नीमध्ये होणारे वाद काही नवीन नाहीत. मात्र, एका शुल्लक कारणावरून नवऱ्याला हातातील फुकनी-बेलन्याने बायकोने डोके फुटेपर्यंत धु-धु धुतल्याची घटना पैठण तालुक्यातील बिडकीन गावात घडली आहे. डब्बा लवकर बनवून देण्याची मागणी केल्याने संतापलेल्या बायकोने मारहाण केली असल्याची तक्रार पतीने पोलिसांत दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील बिडकीन गावातील ३५ वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नी व मुलांसह राहतात. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांनी सकाळी साडेसात वाजता आपल्या पत्नीला लवकर आवरून डब्बा करून देण्याचे सांगितले. मात्र, संतापलेल्या बायकोने आपल्या पतीसोबत वाद घालायाल सुरवात केली. माझ्या पैशावर जगतात म्हणत शिवीगाळही करायला सुरवात केली. तेवढ्यात बाजूला रहाणारी फिर्यादीची सासू आली आणि तीनीही शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. ‘२४ तासांत निर्णय घ्या’, चंद्रकांत पाटलांची काँग्रेसला ऑफर, राजकीय हालचालींना वेग वाद सुरू असतानाच पत्नीने तिच्या हातातील फुकनी आणि बेलनने नवऱ्याला मारहाण करायला सुरवात केली. तर मारहाणीत फुकनी डोक्याला लागल्याने नवऱ्याचा डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यामुळे पतीने तात्काळ बिडकीन पोलीस ठाणे गाठत हकीकत सांगितली. मात्र, डोक्याला मार लागलेला असल्याने पोलिसांनी फिर्यादीला मेडिकल मेमो देऊन बिडकीन शासकीय रूग्णालय इथं पाठवलं. त्यांनतर प्रथमोउपचार घेऊन आल्यानंतर त्याच्या तक्रारीवरून पत्नी व सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.