कीव्ह, युक्रेन :

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये मागील महिनाभरापासून सुरू असलेलं युद्ध आणखीनच भयंकर स्वरुप धारण करत आहे. कारण युक्रेनने शरणागती पत्करण्यास नकार दिल्याने आता रशियाकडून थेट आण्विक शस्त्रास्त्रांच्या वापराची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर ब्रिटन, अमेरिकेसह इतर देशांनीही रशियाविरोधात रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अमेरिकेच्या ‘टायगर टीम’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. (Russia Ukraine War Latest Updates)

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करण्याची घोषणा केल्यानंतर चार दिवसांनी म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने ‘टायगर टीम’ची स्थापना केली होती. ‘टायगर टीम’ ही अमेरिकेसाठी आपत्कालीन परिस्थितीत काम करणारी संघटना आहे. रशियाने आण्विक शस्त्रांसह युक्रेनवर हल्ला चढवल्यास अमेरिकेने काय भूमिका घेतली पाहिजे, याबाबत आता टायगर टीमकडून रणनीती ठरवली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच रशिया-युक्रेन युद्धाच्या प्रत्येक घडामोडीवर ही टीम बारीक लक्ष ठेवून असते. याबाबत न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिलं आहे.

Russia-Ukraine War : युक्रेनविरुद्ध युद्ध करणाऱ्या रशियात कंडोमची विक्री वाढली; जाणून घ्या काय आहे कारण

या वृत्तानुसार, युद्धाबाबतची अमेरिकेची पूर्ण रणनीती ठरवण्याचं काम ही टायगर टीम करत असते. युद्धाची परिस्थिती आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या विविध घटनांवर चर्चा करण्यासाठी या टीमचे सदस्य आठवड्यातून तीन वेळा बैठक घेतात. रशियाकडून युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाचा विस्तार बाजूच्या मोल्दोवा, जॉर्जियासहित इतर देशांमध्ये करण्याचा विचार सुरू आहे का, याबाबतही या टीमकडून अंदाज घेतला जात आहे.

काय आहे टायगर टीमची वैशिष्ट्ये?

युद्धनीती ठरवणाऱ्या या टीममध्ये विविध विषयांतील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व सदस्य युद्धासंदर्भातील रणनीती ठरवण्यात निष्णात आहेत. तालिबान आणि आयएसआयएससारख्या कुख्यात दहशतवादी संघटनांच्या खात्मासाठी आधुनिक शस्त्र निर्माण करण्यासाठीही ही टीम काम करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here