वॉशिंग्टन- करोना व्हायरसचा सर्वात मोठा फटका सध्या अमेरिकेला बसत आहे. या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिका प्रयत्न करत आहे, पण अजूनपर्यंत त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने जर () औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही तर अमेरिका या विरोधात कारवाई करेल असे संकेत दिले. हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा वापर करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारांदरम्यान केला जातो. याआधीही ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या औषधाची मागमी केली होती.

व्हाइट हाउसमधील निकटवर्तीयांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘आतापर्यंत भारताने अमेरिकेसोबत चांगला व्यवहार केला. यावेळीही ते औषधांच्या ऑर्डरवर बंदी घालतील असं मला वाटत नाही.’ ट्रम्प पुढे म्हणाले की, ‘मी असं ऐकलं नाही की, त्यांचा (पंतप्रधान मोदी) हा निर्णय आहे. मला माहीत आहे की, इतर देशांसाठी त्यांनी हे औषध देण्यास बंदी घातली आहे. माझं त्यांच्याशी काल बोलणं झालं. आम्ही सकारात्मक बोललो आणि भारताचा अमेरिकेसोबत नेहमी चांगलाच व्यवहार राहिला आहे.’

ट्रम्प म्हणाले की, मोदींसोबत झालेल्या चर्चेत पंतप्रधानांनी अमेरिकेला हे औषध देण्याचा विचार करू असं सांगितलं. ट्रम्प म्हणाले की, ‘जर भारताने हे औषध अमेरिकेला दिलं तर मला त्यात काही आश्चर्य वाटणार नाही. कारण आमचं त्यावर बोलणं झालं. आम्ही त्यांचं कौतुकच करू. पण जर तरीही त्यांनी हे औषध अमेरिकेला दिलं नाही तर निश्चित आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ आणि प्रत्युत्तर का दिलं जाऊ नये?’

जागतिक महामारी घोषित करण्यात आलेल्या करोना व्हायरसच्या विळख्यात आतापर्यंत अनेक देश आले आहेत. त्यातही इटली, स्पेन यांसारख्या विकसित देशांनीही या व्हायरससमोर गुडघे टेकले आहेत. अमेरिकेच्या आशा आता भारताकडून मिळणाऱ्या मदतीवर टिकून आहे. ट्रम्प यांच्या मते, करोनाच्या उपचारांमध्ये हाइड्रोक्सीक्लोरोक्वाइन औषधाचा सकारात्मक परिणाम समोर आला आहे.

हाइड्रोक्सीक्लोरोक्वाइन औषधाचं सर्वाधिक उत्पादन भारतात
भारतात दरवर्षी मलेरियामुळे लाखोजणांचा मृत्यू होतो. यामुळेच भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणात हाइड्रोक्सीक्लोरोक्वाइनचं उत्पादन करतात. करोना व्हायरसशी लढण्यात या औषधाचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचं दिसत आहे. यामुळेच जगभरातून या औषधाची मागणी वाढली आहे. मात्र, कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे औषधाच्या उत्पादनात घट झाली आहे. जागतिक लॉकडाउनमध्ये भारतीय औषध कंपन्यांनी सरकारकडे या औषधाला लागणारा कच्चा माल एअरलिफ्ट करण्याची मागणी केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here