मुंबई : द काश्मीर फाइल्स सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अलिकडेच एका मुलाखतीमध्ये या काळात त्यांच्यापुढे आलेली आव्हानं, धमक्यांबाबत सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, या सिनेमावरून त्यांना अनेक धमक्या मिळाल्या. केवळ इतकंच नाही तर त्यांच्या ऑफिसमध्ये दोन मुलं जबरदस्तीनं घुसली. त्या मुलांनी त्यांच्या मॅनेजरबरोबर धक्काबुक्की केली. त्यावेळी विवेक त्यांच्या ऑफिसमध्ये नव्हते. परंतु त्यांच्या ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यांबरोबर या दोन्ही मुलांनी गैरवर्तन केलं. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं विवेक अग्निहोत्री यांना व्हाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. अलिकडेच विवेक यांनी त्यांना मिळालेल्या धमक्यांबाबत भाष्य केलं आहे. हे सांगत असताना आतापर्यंत ते या विषयावर का बोलले नाहीत, याचं कारण देखील सांगितलं आहे.

बजेट कमी असताना या सिनेमांनी मोडले बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स

एका न्यूज पोर्टलला विवेक अग्निहोत्री यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘ हो..मी हा सिनेमा केल्याबद्दल धमक्या मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दोन मुलं माझ्या ऑफिसमध्ये जबरदस्ती घुसले होते. त्यावेळी मी आणि माझी पत्नी पल्लवी तिथं नव्हतो. ऑफिसमध्ये माझी मॅनेजर होती. ही मुलं ऑफिसमध्ये बळजबरी घुसले आणि त्यांनी महिला मॅनेजरला धक्काबुक्की केली आणि त्याला ढकलून दिले. त्या दोन्ही बदमाशांनी माझ्याबद्दल विचारणा केली आणि नंतर ते पळून गेले. मी या घटनेची कुठंही वाच्यता केली नाही. कारण या गोष्टीला निष्कारण महत्त्व मिळू नये असं मला वाटत होतं.’

द काश्मीर फाइल्स

द काश्मीर फाइल्स सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल विवेक यांनी सांगितलं की, ‘जगभरात हा सिनेमा दाखवण्यात आला आहे. ३ तास ५० मिनिटे प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिला आहे. हा जोक नाही. लोकांना काश्मीर पंडितांचं दुःख पाहिलं आणि कळलं देखील. कॅनडामध्ये देखील हा सिनेमा पाहिला जात आहे. तिथं केवळ एक शो दाखवला जात होता. परंतु आता तिथं १९ शो दाखवले जात आहेत.’

७० किमी लांबून The Kashmir Files पाहण्यासाठी येत आहेत लोक

विवेक अग्निहोत्री पुढं म्हणाले की, ‘भारतामध्ये हा सिनेमा वादाचा विषय ठरला आहे. राम गोपाल वर्मा यांनी देखील या सिनेमावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही गेल्या चार वर्षांपासून द काश्मीर फाइल्स सिनेमावर काम करत होते. त्यासाठी आम्ही आमचं घरही गहाण टाकलं होतं. सिनेमाचा अभ्यास करण्यासाठी दुनियेच्या कानाकोपऱ्यात गेलो. बॉलिवूडमधील अनेक निर्मात्यांना वाटतं होतं की आम्ही टिपिकल सिनेमा बनवावा.परंतु आम्हाला तसं करायचं नव्हतं. त्यामुळे हा सिनेमा निर्माण करण्यासाठी आम्हीच पुढाकार घेतला आणि पैसा उभा करत हा सिनेमा बनवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here