मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत १३९ नवीन करोनाबाधितांचे निदान झाले. तर करोनाने तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण सक्रिय करोना रुग्णांची संख्या हजारांच्या खाली आली आहे. ही राज्य सरकार आणि आरोग्य विभागासाठी दिलासा देणारी बाब आहे.

राज्य आरोग्य विभागाने गुरुवारी करोना स्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, राज्यात १३९ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर तीन करोना रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत २५५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले आहे. राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, सक्रिय करोना रुग्णांची संख्या हजारांच्या खाली आली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ७८,७२,९५६ इतकी झाली आहे. तर करोना मृत्यूंची एकूण संख्या १, ४३, ७७२ इतकी झाली आहे. बुधवारी राज्यात १४९ नवीन रुग्ण आढळले होते. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता.

Mumbai COVID 19 Cases Updates : मुंबई करोनामुक्तीकडे; गेल्या २४ तासांत शून्य मृत्यूची नोंद
ठाकरे सरकारची मोठी घोषणा; सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत ३०० घरे

कोल्हापूर विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा एकही रुग्ण नोंदवला नाही. गेल्या २४ तासांत २४ जिल्हे आणि १५ महापालिका क्षेत्रात करोनाच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. मुंबईत राज्यातील इतर शहरांपेक्षा सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत ५४ नवीन करोनाबाधितांचे निदान झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे, राज्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या घटली असून, हजारांच्या खाली आली आहे. राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत २५५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७७,२४,२१४ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९६५ आहे. राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे.

‘राम नवमी मिरवणुका आणि गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी द्या’

कुठे किती रुग्ण?

मुंबई विभागात सर्वाधिक ७२ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. पुणे ३४, नाशिक १५, अकोला ६, लातूर ६, नागपूर ३ आणि औरंगाबाद विभागात ३ करोना रुग्ण आढळले आहेत. आठ विभागांपैकी केवळ पुणे विभागात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here