मुलीने पोटात दुखत असल्याचे सांगितल्यानंतर पालकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशीही माहिती पोलिसांनी दिली. आरोपी तरूण हा पीडितेच्या घराशेजारी राहतो. तो पत्नी आणि दोन मुलांना घेऊन पसार झाला. संशयित आरोपीची माहिती मिळाल्यानंतर, त्याला अटक केली. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी आरोपीविरोधात बलात्कार आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.