डिसेंबर २०१९ च्या अखेरीसपासून चीनमधील हुबेई प्रातांची राजधानी वुहानमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर चीनमधील सर्वच ३१ प्रांतात फैलावला. जानेवारी महिन्यानंतर पहिल्यांदाच सोमवारी, एकाही करोनाबाधिताच्या मृत्यूंची नोंद झाली नाही. मार्च महिन्याच्या मध्यापासूनच चीनमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या घटण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. चीनमध्ये करोनाबाधित असलेल्या रुग्णांचीही संख्या कमालीची घटली आहे. नव्याने सापडणारे रुग्ण हे परदेशातून चीनमध्ये परतलेले अथवा परदेशी नागरीक असल्याची माहिती चीनकडून देण्यात आली.
वाचा:
वाचा: चीनमध्ये ८१ हजार ७०८ जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यातील ३३३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ७७ हजार जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून आता जवळपास १३०० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. करोनाबाधितांवर सर्वाधिक यशस्वी उपचार चीनमध्ये करण्यात आले आहे. करोनाच्या संसर्गामुळे चीनमध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन अनेक ठिकाणी हटवण्यात आला असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आणखी वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times