आमदारांना वेतन किती?
राज्यातील आमदारांच मासिक वेतन २ लाख ४० हजार रुपये ९३७ रुपये वेतन असून, महागाई भत्ता ३० हजार ९७४ मिळतो. तर फोन बिल ०८ हजार रुपये, टपाल खर्च १० हजार,पीएचा पगार ३० हजार,संगणक चालकाचा पगार १० हजार, ड्रायव्हरचा पगार २० हजार आणि अधिवेशन काळात बैठकांचा दैनिक भत्ता ०२ हजार रुपये मिळतो. तर आमदारांना निवृत्ती वेतन ५० हजार रुपये मिळतो, तसेच निधनानंतर पत्नीला पेन्शन ४० हजार रुपये मिळतात.
Home Maharashtra aurangabad news paper today: ‘महाराष्ट्रातील आमदार गरीब’, आमदारांना मोफत घर देण्यावरून ‘ठाकरे...
aurangabad news paper today: ‘महाराष्ट्रातील आमदार गरीब’, आमदारांना मोफत घर देण्यावरून ‘ठाकरे सरकार’ होतेय ट्रोल – giving free houses to mlas makes thackeray government a troll on social media
औरंगाबाद : राज्यातील सर्वपक्षीय आमदारांसाठी म्हाडाची ३०० घरे देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली. त्यानंतर याचे पडसाद आता सोशल मीडियावर उमटताना पाहायला मिळत असून, ठाकरे सरकार सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. तर कोट्यवधींची मालमत्ता असणाऱ्या आणि लाखोंचा पगार असणाऱ्या आमदारांना मोफत घर कशासाठी? असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.