नागपूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा विदर्भ दौरा चर्चेत राहिला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजपला टार्गेट केलं तर शिवसेना विदर्भात कमजोर कशी पडली? याबद्दलही त्यांनी मोठं विधान केलं आहे. राऊत हे सोमवारपासूनच विदर्भ दौऱ्यावर होते. बैठकांच्या धडाक्यांनंतर रात्री ते मुंबईत आले. पण याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवरही (Devendra Fadanvis)गंभीर टीका केली आहे.
खरंतर, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून देवेंद्र फडणवीस रोज झोपेतही सरकार पडणार, सरकार पडणार असं बडबडतात आणि बेडवरून खाली पडतात अशी खोचक टीका राऊतांनी केली आहे. आघाडी सरकार स्थापन होऊन आता अडीच वर्ष उलटली तरीही देवेंद्र फडणवीस हे स्वप्नात आहेत. त्यांना स्वप्नरंजनातून उठवायला हवं असंही यावेळी राऊत म्हणाले. राज्य परिवहन महामंडळाचा मोठा निर्णय, तिकीटामध्ये सवलत हवी असेल तर… विदर्भात शिवसेना कमजोर कशी पडली?
दरम्यान, यावेळी बोलतना राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. विदर्भात शिवसेना नवीन नाही. बाळासाहेब ठाकरेंनी इथे अनेक दौऱे केले आहेत. आम्हीही अनेक मोर्चे विदर्भातून काढले. पण भाजपसोबत सत्तेत असताना मोठा वाटा भाजपकडे होता. त्यामुळे शिवसेना विदर्भात कमजोर पडल्याचं पाहायला मिळतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
जिल्हा भगवा फडकवण्यासाठी काय करावे, अशी विचारणा राऊत यांनी केली. हा धागा पकडून आपण जबाबदारी स्वीकारावी, अशी भावना काही शिवसैनिकांनी व्यक्त केली. वर्षभरापासून संपर्क मंत्री नाही. खासदार, आमदारांच्या अखत्यारित नसलेली सर्वसामान्यांची कामे त्यांच्या माध्यमातून सरकार दरबारी मांडता येतात. पक्ष पातळीवर वरिष्ठांचे सहकार्य अपेक्षित आहे. मुंबईतून बळ मिळाल्यास अधिक जोमाने काम करता येईल. रामटेकसह कामठी आणि सावनेर पक्षासाठी अधिक सोयीचे असल्याकडेही राऊत यांचे लक्ष वेधण्यात आले.