मुंबई: करोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन काही समाजविघातक प्रवृत्तींकडून मुंबई पालिकेचं बोधचिन्हं वापरून देणग्या वसूल करण्याचे प्रकार घडत असल्याचं उघड झालं आहे. महापालिकेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून पालिकेचं बोधचिन्ह वापरून देणग्या गोळा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

‘करोना कोविड १९’ या आजाराच्या प्रतिबंधासाठी महापालिका सातत्याने सर्वस्तरीय कार्यवाही करत आहे. यासाठी महापालिकेचे डॉक्टर्स, परिचारिका व विविध खात्यांचे कर्मचारी अव्याहतपणे कार्यरत आहेत. पालिकेचे अधिकारीही अक्षरश: दिवस-रात्र कार्यरत आहेत. याविषयी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांचे सकारात्मक कौतुक देखील होत आहे. मात्र, याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन काही समाज विघातक प्रवृत्ती महापालिकेच्या बोधचिन्हाचा व नावाचा अनधिकृतपणे वापर करून देणग्या गोळा करत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.

पालिकेच्या नावाने देगणी वसूल करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला कोणीही देऊ नये. तसे असे प्रकार आढळल्यास त्वरित पालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

व्हिडिओ:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here