बीड : लग्नानंतर एक महिना सासरी नांदवल्यानंतर छोट्या-मोठ्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. यातूनच तिला घराच्या तिसर्‍या मजल्यावरून ढकलून देत ठार मारलं. ही घटना बीड शहरातील शाहुनगर भागातील उघडकीस आली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या पित्याने सासरच्या लोकांविरूध्द शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवघ्या सहा महिन्यांपूर्वी सुखी संसाराची स्वप्न उराशी बाळगून सासरी पाठवलेल्या आपल्या लेकीचा तिसऱ्या मजल्यावरून फेकून देत खून केल्याच्या घटनेवरून शहरात खळबळ उडाली आहे. बीड शहरातील शाहू नगर भागात यास्मिन शेख हिच्या मृत्युनंतर पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

महाराष्ट्र हादरला! ३ शाळकरी मित्रांचा धक्कादायक मृत्यू, ओढ्याच्या कडेला मिळाली दप्तरं
शहरातील इस्लामपुरा भागात राहणारे रहीम शरिफोद्दिन शेख यांची मुलगी यास्मिन शेख हिचा विवाह २६ ऑक्टोबर २०२१रोजी तिचा विवाह शकूर बशीर शेख (२९) याच्याशी लावला होता. शकूर हा मिस्त्रकाम करतो. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर यासमीनला सासरी जाच होण्यास सुरुवात झाली.

गुरुवारी म्हणजे दि २४ रोजी सकाळी ७ वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला. त्यावरून ते तत्काळ तिच्या घरी पोहोचले. यासमीनला तिसऱ्या मजल्यावरून फेकून संपविल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून पती शकूर बशीर बेग, दीर शेख नसीर बशीर, जाऊ सोफेया नसीर शेख विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे करत आहेत.

राज्य परिवहन महामंडळाचा मोठा निर्णय, तिकीटामध्ये सवलत हवी असेल तर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here