नवी दिल्ली : दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी २९ वर्षीय तरुणाची गोळी मारून हत्या केली आहे. ही घटना दिल्लीतील रोहिणी परिसरात घडली असून शेखर राणा असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. शेखर राणा गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच असून गुंड टिल्लू ताजपुरीया याच्या टोळीसाठी तो काम करत असल्याचंही समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून गोगी गँगमधील तरुणांनी राणा याची हत्या केल्याची माहिती आहे. (Crime News Update)

मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी परिसरात शेखर राणा याच्यावर रात्री १० वाजताच्या सुमारास गोळ्या झाडण्यात आल्या. याबाबत स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राणा याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी राणा याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

महाराष्ट्र हादरला! ३ शाळकरी मित्रांचा धक्कादायक मृत्यू, ओढ्याच्या कडेला मिळाली दप्तरं

गँगवॉरमधून हत्या

काही दिवसांपूर्वी शहरातील कुख्यात गुंड गोगी याची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी शेखर राणा याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून लवकरच त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गर्लफ्रेण्डला भेटायला निघाला होता तरुण

गोगी गँगच्या म्होरक्याचा खून केल्यानंतर टिल्लू गँगच्या सदस्यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. शेखर राणा हादेखील या पार्टीत सहभागी झाला होता. या पार्टीचा व्हिडिओ झाल्यानंतर गोगी गँगने राणा याच्या हत्येचा रचला. अशातच शेखर राणा हा गुरुवारी रात्री रोहिणी परिसरात राहात असलेल्या आपल्या गर्लफ्रेण्डला भेटायला जात असताना गोगी गँगमधील काही तरुणांनी त्याला गाठलं आणि त्याच्यावर गोळीबार केला. यावेळी दोन गोळ्या लागून जखमी झालेल्या राणा याचा मृत्यू झाला आहे.

delhi murder

दिल्ली खून प्रकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here