मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या संदर्भातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रद्धा आणि तिचा बॉयफ्रेंड, सेलेब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ यांचं ब्रेकअप झालं आहे. गेल्या चार वर्षांपासून हे दोघंजण रिलेशनमध्ये होते. परंतु आता या दोघांनी त्यांचं नातं संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे.

एका न्यूज पोर्टलनं दिलेल्या बातमीनुसार श्रद्धा आणि रोहन हे का वेगळे झाले याचं कारण समोर आलेलं नाही. परंतु श्रद्धा कपूरचा गोव्यात साजऱ्या झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीला रोहन उपस्थित नव्हता. खरं तर त्या दिवशी त्याला कोणतंही काम नव्हतं तरी देखील तो त्या पार्टीला गेला नाही. श्रद्धा आणि रोहन यांच्या नात्यामध्ये जानेवारीपासूनच तणाव आल्याचं काही न्यूज पोर्टलनं प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्ये म्हटलं आहे. अखेर फेब्रुवारीमध्येच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचंही म्हटलं आहे.

कपिल शर्मा पुन्हा एकदा चर्चेत, शोच्या सहकलाकारानेच केला आरोप

श्रद्धा कपूर रोहन श्रेष्ठ

लहानपणापासून एकमेकांचे मित्र

श्रद्धा कपूरच्या संपूर्ण कुटुंबाला रोहन पसंत होता. श्रद्धा आणि रोहन हे लहानपणापासूनच मित्र आहेत. या दोघांच्या कुटुंबाचे देखील एकमेकांशी चांगलं नातं आहे. श्रद्धा आणि रोहन गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, त्यांनी कधीही हे नातं जाहीर केलं नव्हतं. हे दोघंजण अनेकदा डिनर डेटला एकत्र दिसायचे. इंटरनेटवर तर या दोघांनी लग्न केल्याची बातमीही आली होती. प्रत्यक्षात मात्र लग्न होण्याआधीच हे दोघंजण वेगळे झाले आहेत. दरम्यान, या ब्रेकअपनंतर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

किरण खेर यांनी आपल्या लेकाला पूर्ण करायला सांगितली एक इच्छा, Video Viral

श्रद्धा कपूरच्या कामाबद्दल सांगायचं तर ती लव रंजनच्या सिनेमात रणबीर कपूरबरोबर दिसणार आहे. त्याशिवाय नागिन ट्रायलॉजीमध्ये देखील ती दिसणार आहे. याशिवाय पंकज पराशरचा सिनेमा चालबाज इन लंडन सिनेमातही काम करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here