औरंगाबाद : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणादरम्यान केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातील ब्राह्मण समाज आक्रमक होताना पाहायला मिळत होते. मात्र, या सर्व प्रकरणी राऊत यांनी आज औरंगाबाद इथे ब्राह्मण समाजाची भेट घेत, आपण केलेल्या वक्तव्याची माफी मागितली आहे. तर “आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही’, असे विधान विनायक राऊत यांनी केले होते.

संजय राऊतांची बोचरी टीका, म्हणाले ‘फडणवीस झोपेतही बडबडतात अन्…’
औरंगाबाद येथे २३ मार्चला एका भाषणात राऊत यांनी “आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही’, हे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्यभरातील ब्राह्मण समाजाने आक्रमक भूमिका घेत खासदार राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज राऊत यांनी औरंगाबाद येथील ब्राह्मण समाजाच्या सदस्यांची भेट घेतली.

‘मी आमदाराची पत्नी आहे, एकेका आमदाराकडं किती प्रॉपर्टी असते ते मला चांगलं माहीत आहे’
यावेळी बोलताना ते म्हणाले की, काही कळत नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाले. त्यात कोणाचाही अनादर करणे हा उद्देश नव्हता. मी आज नतमस्तक आणि माफी मागायला आलो. ब्राह्मण समाजाची माफी मागून त्यांनी कृपा आशीर्वाद कायम ठेवा असे म्हटले आहे. तर काही चूक झाली असेल तर माफ करा असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र हादरला! ३ शाळकरी मित्रांचा धक्कादायक मृत्यू, ओढ्याच्या कडेला मिळाली दप्तरं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here