Kirit Somaiya | शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त. शिवसेनेला मोठा धक्का. किरीट सोमय्यांनी जखमेवर चोळलं मीठ. प्रताप सरनाईकांना अटक होण्याची शक्यता.

 

Pratap Sarnaik Somiaya
Kirit Somaiya: श्रीधर पाटणकर यांच्या पाठोपाठ प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाईचा उगारलेला बडगा हा महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हायलाइट्स:

  • प्रताप सरनाईक आणि त्याचा भागीदार आस्था बिल्डर्सने एनएसईएल घोटाळ्यात २१६ कोटी रुपये ढापले होते
  • २५ कोटी रुपये प्रताप सरनाईक यांच्या बँक खात्यात जमा झाले होते
मुंबई: सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आज प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. पुढे केव्हातरी ईडी प्रताप सरनाईक यांना अटकही करेल, असे सूचक वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. ईडीने एनएसईएल घोटाळा प्रकरणात प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावर कारवाई केली आहे. ईडीच्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे. यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या दोन सदनिका आणि टिटवाळा परिसरातील एका भूखंडाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी किरीट सोमय्या यांनी म्हटले की, आणखी एक घोटाळेबाज समोर आला आहे. प्रताप सरनाईक आणि त्याचा भागीदार आस्था बिल्डर्सने एनएसईएल घोटाळ्यात २१६ कोटी रुपये ढापले होते. यापैकी २५ कोटी रुपये प्रताप सरनाईक यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. याच पैशातून प्रताप सरनाईक यांनी टिटवाळा येथे भूखंड खरेदी केला. आज ईडीने या प्रकरणात पुढची कारवाई केली आहे. हे प्रकरण इथेच थांबणार नाही. उद्धव ठाकरे यांनी प्रताप सरनाईक यांचे कितीही गुन्हे माफ केले तरी किरीट सोमय्या ही लढाई थांबवणार नाही. २०१३ मध्ये मी एनएसईएल घोटाळा प्रकरणात जनहित याचिका दाखल केली होती. हा एकूण ५६०० कोटी रुपयांचा घोटाळा असून यामध्ये १३०० गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. आज या प्रकरणात प्रताप सरनाईक यांची संपत्ती जप्त झाली आहे. उद्या किंवा पुढे कधीतरी त्यांनाही अटक होईल, असे सोमय्या यांनी म्हटले.
Pratap Sarnaik: शिवसेनेला आणखी एक झटका, ‘ईडी’कडून प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाखांची संपत्ती जप्त
श्रीधर पाटणकर यांच्या पाठोपाठ प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाईचा उगारलेला बडगा हा महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. एनएसईएल घोटाळा प्रकरणात आतापर्यंत २५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल ३२५४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये आता प्रताप सरनाईक यांचीही भर पडली आहे. प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp leader kirit somaiya reaction on ed attaches properties of shivsena pratap sarnaik
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here