खासदार राजू शेट्टी निवडणुकीदरम्यान आमदार भुयार यांच्यासाठी आमदारकीचे तिकीट मागणीसाठी गेले तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ‘फडतूस माणसासाठी तुम्ही जागा मागत आहात’ असे सूचक विधान केले होते अशी आठवण शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी काढली.
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, ‘देवेंद्र भुयारबद्दल माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचा घात केला असेल तर असली घाण आमच्या संघटनेत राहू शकत नाही. त्याला संधी द्यायची का?’ असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला. ‘मी माझ्या कष्टाचा पैसा एका चोराला दिला याचं दु:ख वाटतं. मी माझं घर विकलेले पैसे या हरामखोराला दिले. अजित पवार यांचे फोटो देवेंद्र भुयारच्या बॅनरवर दिले. देवेंद्रसाठी मी जेव्हा अजित पवार यांना तिकीट मागत होतो तेव्हा अजित पवार म्हणाले की फडतूस माणसासाठी तुम्ही जागा मागत आहात. विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मी याला संधी दिली. मी तुमची माफी मागतो’, असं शेट्टी यावेळी म्हणाले.