मुंबई : ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल ११ कोटी ३५ लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून करण्यात आली आहे. ही कारवाई म्हणजे आमदार सरनाईक (Pratap Saranaik) यांना मोठा धक्का असल्याची चर्चा सुरू असतानाच स्वत: त्यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे. तसंच ईडीकडून नेमकी कोणती संपत्ती जप्त करण्याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे, याबाबतही सरनाईक यांनी माहिती दिली आहे.

‘ईडीने हिरानंदानीतील माझं राहतं घर जप्त करण्याची नोटीस दिली आहे. तसंच मीरा रोड येथील जमीन जप्त केली जाईल, असंही सांगितलं आहे. मात्र माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून ईडीच्या कारवाईविरोधात मी न्यायालयात जाऊन ही कायेदशीर लढाई लढणार आहे,’ असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

Kirit Somaiya: आज प्रॉपर्टी अटॅच झालेय, उद्या प्रताप सरनाईकही अटॅच होतील: किरीट सोमय्या

‘केंद्र-राज्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर कारवाई’

प्रताप सरनाईक यांनी त्यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरून बोलताना म्हटलं आहे की, ‘शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून पक्षाची भूमिका मांडत असताना मी कंगना रणौत आणि नंतर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कबंग आणला होता. त्यानंतर माझ्यावर कारवाई झाली. तसंच आता राज्यात सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांवर कारवाई झाली आहे. कदाचित केंद्र-राज्य संघर्षामुळे ही कारवाई झाली असेल.’

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमचे कुटुंबप्रमुख असून ते नेहमीच आमच्या पाठिशी असतात, असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here