मुंबई : द काश्मीर फाइल्सनं बाॅक्स ऑफिस चांगलंच गाजवलं आहे. आतापर्यंत सिनेमानं २०० कोटींचा टप्पा गाठला आहे. खूप कमी वेळेत हे लक्ष्य गाठलं आहे. या सिनेमाचं कौतुक होत आहे, तसेच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे सिनेमा वादग्रस्त ठरला आहे. अनेक राज्यांत हा सिनेमा टॅक्स फ्री केला आहे. तर अनेक राज्यं टॅक्स फ्रीची मागणी करत आहेत. याच दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले केजरीवाल?
सिनेमाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. मग दिल्ली विधानसभेतही ही चर्चा होणारच. गुरुवारी विधानसभेत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले, द काश्मीर फाइल्स सिनेमा करमुक्त करण्याची मागणी सुरू आहे. त्यापेक्षा तो युट्युबवर का नाही टाकत? एवढी आवड आहे तर विवेक अग्निहोत्रींना सांगा युट्युबवर टाकायला. सगळे लोक पाहतील. मग करमुक्त करायची गरजच काय?

कपिल शर्मा पुन्हा एकदा चर्चेत, शोच्या सहकलाकारानेच केला आरोप

द काश्मीर फाइल्स

या राज्यात सिनेमा करमुक्त
द काश्मीर फाइल्सला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच काही राज्यांनी तो करमुक्त केला आहे. त्यात हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश ही राज्यं आहेत.

किरण खेर यांनी आपल्या लेकाला पूर्ण करायला सांगितली एक इच्छा

द काश्मीर फाइल्स रिलीज झाला तेव्हा अक्षय कुमारचा बच्चन पांडे त्याला टक्कर देईल असं वाटत होतं. पण बच्चन पांडे फारसा चालला नाही. आतापर्यंत या सिनेमानं बाॅक्स ऑफिसवर फक्त ५० कोटींची मजल मारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here