मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अभिभाषण न करताच माघारी परतावं लागलं होतं. यावरून मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ‘राज्यपालांचं अभिभाषण होऊ शकलं नाही, याची मला खंत आहे. तसंच त्यांना राष्ट्रगीतालाही थांबता आलं नाही. एवढा मोठा अपमान आजपर्यंत कधीच या पदावरील व्यक्तीचा झाला नसेल,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Cm Uddhav Thackeray On Bjp)

‘राज्यपाल हे संवैधानिक पद आहे, विरोधी पक्षातील अनेकजण राज्यपालांकडे वेळोवेळी तक्रार करण्यासाठी जातात. तो त्यांचा अधिकारही आहे. मात्र हा अधिकार लक्षात ठेवताना काही प्रथा आणि परंपराही लक्षात ठेवायला हव्यात. आपल्या राज्याला एक संस्कृती आहे. राज्यपाल आपल्या अभिभाषणात राज्याने काय काम केलं हे सांगणार होते, मात्र काही लोकांनी त्यांचं अभिभाषण होऊ दिलं नाही,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Iqbal singh chahal: आयकर विभागाच्या कारवाईला वेग; इक्बाल सिंह चहल यांना चौकशीची नोटीस

दाऊद प्रकरणावरून भाजपवर निशाणा

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या गँगशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने अधिवेशन काळात कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसंच राज्य सरकारलाही घेरण्याचा प्रयत्न केला. यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘भाजपकडून महिनाभर दाऊद एके दाऊद करण्यात आलं. राज्यात जी चांगली कामे सुरू आहेत ती काही लोकांना दिसत नाही. काही लोकांना आरशामध्ये बघितलं तरी भ्रष्टाचार दिसतो,’ असा टोला मुख्यमंत्र्यांना भाजपला लगावला आहे.

दरम्यान, करोना काळात आपली यंत्रणा रात्रंदिवस काम करत होती, मुख्यमंत्री म्हणून मला याचा अभिमान आहे. कोव्हिड काळात आपण मोफत जेवण दिलं, ८ कोटी शिवभोजन थाळ्यांचं आपण आजपर्यंत वितरण केलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शासनाने केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here