Uddhav Thackeray | भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. ‘नवाब मलिक यांच्यावर केवळ आरोप झाले आहेत. त्याची चौकशी होईल. ते दोषी असतील तर व्हायचं ते होईल.

 

Devendra Uddhav (1)
Uddhav Thackeray: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

हायलाइट्स:

  • मी टीकेला किंवा बदनामीला घाबरत नाही.
  • बदनामी करताना ती कोणत्या थराला जाऊन करावी?
मुंबई: नवाब मलिक यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना माहिती पुरवली. फडणवीस यांचे कौशल्य पाहता केंद्र सरकारने त्यांना रॉ किंवा सीबीआयमध्ये घेतले पाहिजे. जेणेकरून ही कामे अधिक वेगाने होतील, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपला लगावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या सर्व आरोपांना उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत चोख प्रत्युत्तर दिले.
Uddhav Thackeray:’पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर तुम्हीच देशमुख-मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसला असता’
मी टीकेला किंवा बदनामीला घाबरत नाही. पण बदनामी करताना ती कोणत्या थराला जाऊन करावी? नवाब मलिक हे दोषी असतील तर त्यांच्यावर जरूर कारवाई करू. पम आरोप करताना ते एवढ्या थराला जाऊन केले जातात की कधीकधी तथ्यहीन आरोपही सत्य वाटायला लागतात. नवाब मलिक हे दाऊदचे हस्तक असल्याचे सांगितले जाते. पण केंद्रीय तपासयंत्रणा इतक्या पोकळ आहेत का, दाऊदचा हस्तक इतके वर्षे देशात फिरतोय, निवडून येतोय आणि केंद्रीय यंत्रणांना त्याचा पत्ताही लागत नाही. केंद्रीय यंत्रणा फक्त थाळ्या वाजवणे आणि दिवे पेटवण्याचे काम करतात का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
मुख्यमंत्र्यांच्या संयमाचा बांध फुटला; कुटुंबावर आरोप करणाऱ्या भाजपला खुलं आव्हान
एखादा तिरंदाज बाण सोडतो तेव्हा लक्ष्यभेद करण्यासाठी त्याला कौशल्य पणाला लावावे लागते. केंद्रीय तपास यंत्रणा या म्हणजे बाण आहेत. सध्या हे बाण सोडले जात नाही, तर ते आपल्याला हवे त्या लक्ष्यावर आणून खुपसले जात आहेत. नवाब मलिक यांच्याबद्दलची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ईडीला दिली. म्हणजे ईडी इतक बेक्कार आहे का त्यांना काहीच माहिती नाही. द्या माहिती द्या, कोणाला ठोकायचंय, द्या ठोकतो, असा त्यांचा कारभार आहे का? म्हणजे माहिती देणारे तुम्हीच, आरोप करणारे तुम्हीच, चौकशी करणारे तुम्हीच आणि शिक्षा देणारेही तुम्हीच असता. कारण अशा कडक केसेस तयार करून दिल्यावर न्यायालय तरी काय करणार? आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे पण सर्व यंत्रणा अशा राबवल्या तर काय होणार? ती ईडी आहे की घरगडी आहे, असा प्रश्न आता निर्माण झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटेल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : devendra fadnavis should work in raw and cbi says uddhav thackeray in vidhan sabha
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here