pravin darekar: Pravin Darekar : प्रवीण दरेकर आणखी अडचणीत; सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला – mumbai sessions court rejected anticipatory bail application of bjp leader pravin darekar in mumbai district bank case
मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे (Mumbai bank fraud) भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना अटकेपासून संरक्षण मिळू शकले नाही. सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
मुंबई हायकोर्टात अपील करायचे असल्याने, दोन आठवड्यांपर्यंत अटकेपासून असलेले अंतरिम सरंक्षण कायम राहावे, अशी दरेकर यांच्या वकिलांतर्फे न्यायालयाला विनंती करण्यात आली. सत्र न्यायालयाने दरेकर यांना मंगळवार, २९ मार्चपर्यंत दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयात अपील करता यावे, यादृष्टीने २९ मार्चपर्यंत अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही वर्गांतून निवडून आले होते. मात्र, निकाल अधिकृतपणे जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र घोषित करण्यात आले होते. प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरु ठेवली होती. दरेकर यांनी ज्या मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढविली होती, त्या मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचे दाखवण्यात आले होते.