मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करोना रुग्णसंख्येत घट नोंदवली होती. मात्र, शुक्रवारी राज्य आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, राज्यात काल, गुरुवारच्या तुलनेत, आज शुक्रवारी दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत २७५ नवीन करोनाबाधितांचे निदान झाले आहे. तर दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंतेत किंचित भर पडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे करोना लाट नियंत्रणात आल्याचे चित्र होते. मात्र, शुक्रवारी राज्य आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर, आरोग्य प्रशासन आणि राज्य सरकारच्या चिंतेत काहिशी भर पडली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत कालच्या तुलनेत रुग्णवाढ नोंदवली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत २७५ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याच कालावधीत ३४६ रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दिलासा देणारी एकमेव बाब म्हणजे, सक्रिय रुग्णांची संख्या हजारांच्या खाली आहे. राज्यात ८९२ सक्रिय रुग्ण आहेत.

Pravin Darekar : कोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रवीण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया
Raigad News : रोहा गटविकास अधिकारी ‘असा’ अडकला ACB च्या जाळ्यात

राज्यात आतापर्यंत करोना रुग्णांची एकूण संख्या ७८,७३,२३१ इतकी आहे. तर आजपर्यंत राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७,२४,५६० इतकी आहे. तर एकूण मृत्यूची संख्या १,४७,७७९ इतकी झाली आहे. आजपर्यंत एकूण ७,९१,५६,००२ नमुने तपासण्यात आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के इतके आहे. तर मृत्यूदर १.८७ टक्के आहे.

मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्या कमी होत असून, धारावी करोनामुक्त झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ३८ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर ४७ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर, एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आजपर्यंत १०,३७,९२६ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण २४८ आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर हा १९७९२ दिवसांवर पोहोचला आहे. कोविड रुग्णवाढीचा दर हा १८ ते २४ मार्चदरम्यान ०.००४ टक्के आहे.

Pravin Darekar : प्रवीण दरेकर आणखी अडचणीत; सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here