अनिल परब म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांच्या स्टाफशी संबंधित हा विषय नाही. ‘मातोश्री’च्या बाहेर जे पोलीस असतात. इतर कर्मचारी असतात. त्यांच्यातील काही लोकांचा संशयित करोनाग्रस्ताशी थेट संपर्क आला असण्याची शक्यता आहे. या शक्यतांचा विचार करून त्यांच्यापैकी काही लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे आणि त्यांची तपासणी सुरू आहे.’
‘मातोश्री’च्या गेट क्रमांक २ जवळ असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळ चहाची टपरी असून, मागील दोन-तीन दिवसांपासून हा चहावाला परिसरात आढळून आला नाही. त्यामुळे नागरिकांनी शोध घेतला असता त्याला ताप आणि खोकला येत असल्याचे आढळले. त्याच्या वैद्यकीय तपासणीचा अंतिम अहवाल येणं अद्याप बाकी असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, खबरदारी म्हणून ‘मातोश्री’, म्हाडा मुख्यालय ते साहित्य सहवास वसाहतीपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात अग्निशमन दलातर्फे सॅनिटायझिंग फवारणी करण्यात आली असून ठिकठिकाणी जंतुनाशक पावडर फवारण्यात आली आहे. या भागात आणखी कुणाला ताप, खोकला येत आहे का याचा शोध पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे घेण्यात येत असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times