टोकियो: मागील काही दिवसांत करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर जपानमधील सात प्रातांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राजधानी टोकियो, ओसका या शहरांचाही समावेश आहे. करोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर पंतप्रधान शिंजो आबे हे आणीबाणी जाहीर करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

पंतप्रधान शिंजो आबे यांनी याआधी सरकारची बैठक बोलावली होती. त्यानंतरच आणीबाणीची घोषणा करण्यात आली. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटले की, नागरिकांच्या जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतील, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. टोकियो आणि ओसाकासारख्या शहरांमध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली.

वाचा: वाचा:
मध्यरात्रीपासून आणीबाणीची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. आणीबाणी लागू झाल्यानंतर संबंधित राज्यांच्या राज्यपालांना औद्योगिक क्षेत्र बंद करण्यासह, लोकांना घरातच राहण्याचे आदेश प्रभावीपणे देता येणार आहेत. टोकियो, ओसाकासह सैतमा, कांगवा, चीबा, हयोगो आणि फुकुओका आदींचा समावेश आहे. संपूर्ण देशभरात वेगाने फैलावू शकतो अशी भीती सरकारला वाटत असल्यामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली असल्याची चर्चा आहे.

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य अधिकारी आणि खासदारांचा सरकारवर दबाव होता. मागील तीन आठवड्यांपासून सरकार निर्णय घेण्याचे टाळत असल्याची चर्चा आहे. जपानमध्ये ३९०६ जणांना करोनाची बाधा असून ९२ जणांचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here