औरंगाबाद: देशातील तपास यंत्रणाचा वापर विरोधकांवर दबाव आणण्यासाठी केला जात असल्याचे आरोप अनेकदा केले जात असून याच मुद्यावर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख यांनी ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लाखो कोटी रुपये कमवणाऱ्या विमा कंपन्यावर कधी धाडी का पडत नाही, या कंपन्यांकडून ईडीला हप्ते मिळतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेट्टी औरंगाबाद दौऱ्यावर असून,पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ( leader criticizes )
क्लिक करा आणि वाचा-
यावेळी बोलताना शेट्टी यांनी ईडीकडून केल्या जात असलेल्या कारवाईवर संशय व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या पिक विमामध्ये लाखो कोटी रुपये कमावणाऱ्या विमा कंपन्या यांना दिसत नाही. आशा विमा कंपन्यांवर कधी धाडी पडल्याचं आम्ही ऐकलं नाही, का त्यांच्या डायरेक्टरला हप्ते पोहचतात का? असा सवाल शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला.
क्लिक करा आणि वाचा-
भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो कोणत्या पक्षाच्या नेत्यांनी केला हे महत्त्वाचे नसते. त्यामुळे ज्याने भ्रष्टाचार केला त्याला त्याच्या पापाची फळ मिळालीच पाहिजे. पण आज फक्त सूड घेण्यासाठी धाडी पडत असेल, तर हे चुकीचं आहे. एका बाजूला विशिष्ट लोकांवर धाडी पडत आहेत तर दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे असे राजू शेट्टी पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-