kirit somaiya: Kirit Somaiya: आता केंद्रीय गृह सचिवांनाच फोन लावणार!पोलिसांकडून कोंडी झाल्याने किरीट सोमय्या संतापले – i will complaint against dapoli police to union home ministry secretary says bjp kirit somaiya
प्रसाद रानडे, रत्नागिरी: भाजप नेते किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे दापोली पोलीस ठाण्याबाहेर सध्या हायव्होल्टेज ड्रामा रंगला आहे. दापोली पोलिसांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना साई रिसॉर्टवर जाण्यास मज्जाव केला. त्यासाठी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांच्या तब्बल २०० गाड्याही रोखून धरल्या. किरीट सोमय्या आणि निलेश राणे हे केवळ मोजक्याच कार्यकर्त्यांसह रिसॉर्टवर जाऊ शकतात, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. त्यामुळे सकाळपासून मोठा ताफा घेऊन दापोलीत दाखल झालेल्या किरीट सोमय्या यांची चांगलीच कोंडी झाली. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या संतापाचा पारा चढला. आपण याविरोधात केंद्रीय गृह सचिवांकडे फोन करून तक्रार करू, अशा इशाराच किरीट सोमय्या यांनी दिला. तर निलेश राणे यांनी आपण केंद्रीय गृह सचिवांशी बोलून रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक फोनवरून कोणाशी बोलत होते, याचा सीडीआर मागवू, असे सांगितले. Nilesh Rane: आमच्या आजुबाजूने लहानसा दगडही भिरकावला गेला तर शांत बसणार नाही; निलेश राणेंचा पोलिसांना इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग हे ठाकरे सरकारच्या दबावाखाली तरी वागत आहेत असा खळबळजनक आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. आम्हाला दोन तास बसवून ठेवले,पोलीस अधीक्षक आम्हाला भेटले नाहीत,कोणतीही नोटीस नाही पोलीस अधीक्षक दबावाखाली काम करत आहेत आमचा एफआयआर दाखल करू देत नाहीत ही कोणती पध्दत,असा खडा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला. माजी खासदार व एक सिनियर नेत्याला चुकीची वागणूक देत आहेत. आमचा जीव गेला तरी आम्ही येथून हलणार नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले. Kirit Somaiya: उद्धव ठाकरे… आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकायला परवानगी घेणार नाही,थेट कारवाईच करू; सोमय्यांचा हल्लाबोल
पोलीस अधीक्षकांना फोनवरून सूचना; निलेश राणेंचा आरोप
आम्ही पोलीस ठाण्यात असताना त्यांना पाच-पाच मिनिटांनी फोनवरून सूचना दिल्या जात होत्या. त्यानुसार पोलीस आपली भूमिका बदलत होते. काहीवेळानंतर पोलिसांनी अचानक आम्हाला जाण्यास सांगितले. आम्हाला पोलीस ठाण्यात इतका वेळ बसवून का ठेवलं, हे पोलिसांनी सांगितलं नाही. मात्र, साई रिसॉर्टवर तुम्ही फक्त चार ते पाच कार्यकर्त्यांनाच घेऊन जाऊ शकता, असे पोलिसांनी सांगितल्याचे निलेश राणे यांनी म्हटले. पोलिसांना सोमय्यांचा जीव धोक्यात टाकायचा आहे. पोलीस कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळे आम्ही आता पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून बसणार, असेही निलेश राणे यांनी म्हटले.