नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी घोषित केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन येत्या १४ एप्रिलला संपणार आहे. मात्र, देशातील विषाणूच्या संसर्गाबाबतची परिस्थिती पाहता सरकार लॉकडाउनचा कालावधी वाढवणार अशी चर्चा ऐकू येऊ लागली आहे. अशात महत्त्वाचे म्हणजे देशातील अनेक राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडे लॉकडाउन वाढवण्याची विनंती केली आहे, अशी माहिती केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिली आहे.

लॉकडाउन वाढवायचा का, यावर केंद्र सरकार करतेय विचार

देशातील अनेक राज्ये आणि तज्ज्ञांनी केंद्र सरकारला लॉकडाउन वाढवण्याची विनंती केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. या नंतर केंद्र सरकार आता राज्य सरकार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यावर विचार करत आहे.

२५ मार्चपासून लागू करण्यात आला लॉकडाउन

देशभरात ची वाढती संख्या रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून देशभरात २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाउन घोषित केला आहे. लॉकडाउन येत्या १४ एप्रिल या दिवशी समाप्त होत आहे. जे भाग करोनाचे हॉटस्पॉट नाहीत अशा भागांमधील लॉकडाउन केंद्र सरकार हटवेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. या बरोबरच लॉकडाउन ३ जूनपर्यंत वाढवण्यात यावा, असा आग्रह तेलंगण सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याचे वृत्तही प्रसारित झाले होते. मात्र तेलंगण सरकारने नंतर या वृत्ताचे खंडण केले होते.

देशात करोनाने १०० हून अधिक मृत्यू
देशभरात आतापर्यंत १०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ४,४०० पेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. सर्वांनी घरातच राहून करोनाचा सामना करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार देशातील जनतेला केले आहे.

१४ एप्रिल या दिवशीच लॉकडाउन उठवला जाईल असे काही गरजेचे नाही, लोकांना यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल, असे उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. उत्तर प्रदेशात करोनाचे ३०५ रुग्ण आहेत, तर ३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here