अमरावती : अमरावती जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वारंवार अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अशात आताही एकाने भीषण अपघातामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर मार्गावरील रहाटगाव रिंग रोडजवळ दोन गाड्यांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तवेरा आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला असून या अपघातामुळे ट्रकची दोन्ही चाक तुटून खाली पडला तर पांढऱ्या रंगाची तवेरा कार ही चकनाचूर झाली आहे. या कारमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष तर एका लहान मुलीचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अपघातस्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती आहे. chandrakant patil: भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना थेट इशाराच दिला; म्हणाले… अंजनगाव बारीवरून शिरजगाव कसब्याच्या दिशेने जाणाऱ्या तवेरा आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तवेरामधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण जखमी झाले आहे. मृतांमध्ये आठ वर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे.
बडनेरालगत असलेल्या अंजनगाव बारी येथील पोकळे परिवारातील सदस्य एका कार्यक्रमासाठी शिरजगाव कसबा इथं जात होते. शिरजगाव कसब्याच्या दिशेने जात असताना रहाटगाव रिंग रोडवर हॉटेल कंदीलसमोर तवेरा आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली.