बारामती : अजितदादा आपल्या भाषणातून मिश्किल टोलेबाजी करत असतात. ग्रामीण भागातील कार्यक्रमांमध्ये त्यांचा विनोदी आणि मनमोकळेपणाने बोलण्याचा स्वभाव अनेकदा पहायला मिळतो. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना चिमटे काढताना अजितदादांनी टोलेबाजी केली. मात्र, त्यातून त्यांनी सावरतं घेत आता गाडी घसरायला लागली आहे. मी थांबतो असं म्हणत आपल्या भाषणाची सांगता केली.
‘बांधकाम विभागाच्या चाव्या तुमच्या हातात आहेत. परंतु, त्यांना कुठं माहिती की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मी जर तिजोरी उघडली नाही तर त्यांना काय मिळणार घंटा.’ असं म्हणत आता गाडी घसरायला लागली आहे आता थांबतो, अशी सारवारवी करत अजित पवारांनी सावरून घेतलं. दरम्यान, त्यांच्या या भाषणाची चांगलीच चर्चा सुरू आहे.