Kolhapur Byelection: काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे निधन झाल्यामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून पालमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी ‘मिसळ पे’ चर्चा केली तर आज चंद्रकांत पाटील यांनी  (Chandrakant Patil) ‘चाय पे चर्चा’ केली. 

चंद्रकांत पाटलांची चाय पे चर्चा

आज चंद्रकांत पाटील यांनी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी रंकाळा परिसरात संवाद साधला. यावेळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी चंद्रकांत पाटील यांनी भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी ‘चाय पे चर्चा’ केली.

सतेज पाटलांचा मिसळवर ताव

पालकमंत्री सतेज पाटील यांनी जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मस्जिद परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी झणझणीत कोल्हापुरी मिसळचा आस्वाद घेतल्याचे पाहायला मिळाले. या भागातील नागरिकांशी विकासात्मक कामे आणि विविध बाबींवर त्यांनी चर्चा केली. या वेळी सतेज पाटील म्हणाले की, चंद्रकांत जाधव यांच्या अकाली जाण्याने ही पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षाने कोल्हापूरकरांवर लादली आहे. आता जयश्री जाधव या आपल्या बहिणीला निवडून आणणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपला आशीर्वाद एका बहिणाला देऊन सर्वांनी ही निवडणूक आपली आहे, असे समजून कार्यरत राहावे असे पाटील म्हणाले.

दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत दोन्ही बाजूंनी प्रचाराला वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील हे कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. तर भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्यासाठी महाडिक गटाने कंबर कसली आहे. तसेचं स्वत: चंद्रकांत पाटील मैदानात उतरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here