ठाणे : ठाणे जिल्हा बलात्काराच्या घटनांनी हादरला. ७० वर्षांहून अधिक वयाच्या दोन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरूणाला पोलिसांनी अटक केली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. वासिंद पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणी तरूणाला अटक केली असून, तो २२ वर्षीय आहे. तो शहापूरचा रहिवासी आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरूण २० मार्च रोजी एका ७० वर्षीय महिलेच्या घरात घुसला. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर शेजारीच असलेल्या अन्य एका घरात नराधम तरूण घुसला. तेथील ७२ वर्षीय महिलेवरही त्याने बलात्कार केला. या घटनांनंतर आरोपी तरूण तेथून पसार झाला.

Thane : इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत २ कामगारांचा गुदमरून मृत्यू
१८ कोटींची फसवणूक; महिला अटकेत

२३ मार्च रोजी पीडित वृद्ध महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रारी दाखल केल्या. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेत, तात्काळ तपास सुरू केला. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी २५ मार्च रोजी आरोपी तरूणाचा शोध घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणी पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेतील दोन्ही पीडित वृद्ध महिलांचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्या आधारे आरोपी तरूणाला अटक करण्यात आली आहे. दोन्ही पीडित वृद्ध महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

ग्रामीण भाग अंधारात; दीड कोटीचे वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here